Homeताज्या बातम्यागोणेवाडी हद्दीत बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट, गोणेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये नागरिकांना...

गोणेवाडी हद्दीत बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट, गोणेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी

गोणेवाडी (ता.मंगळवेढा) हद्दीतील ऊस शेत परिसरात बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लेंडवे चिंचाळे येथील शेतकरी दादासो राजाराम लेंडवे हे कामानिमित्त शेतात गेले असता, ऊस शेताच्या बांधावरून बिबट्यासदृश प्राणी जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सुमारे २०० ते ३०० फूट अंतरावरून त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या प्राण्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ही माहिती त्यांनी तात्काळ लेंडवे चिंचाळे येथील पोलीस पाटील हिम्मतराव पाटील यांना दिली. घटनेची दखल घेत पोलीस पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेतकरी व मजुरांनी शेतात एकट्याने जाणे टाळावे, लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच रात्रीच्या वेळी अनावश्यक हालचाल करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बिबट्यासदृश प्राणी किंवा संशयास्पद हालचाल पुन्हा दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखून तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे गोणेवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झुंज एकाकी..बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज भोसे गटासह मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात कायम स्मरणात...

नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे...

नंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे....

प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘ नंदेश्वर पॅटर्न ‘ ठरला निर्णायक

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधक आणि हायव्होल्टेज ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवित...

भोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे ठरणार निर्णायक,...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात यंदा तिरंगी...

error: Content is protected !!