Homeताज्या बातम्याकाँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

नंदेश्वर / प्रतिनिधी : तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच संदीप पवार यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या जबाबदाऱ्यांची अधिकृत घोषणा केली.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, काँग्रेस पक्षाने तालुका पातळीवर सोशल मीडिया संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर टीका करताना, सरकारची निष्क्रियता, तसेच जनतेच्या हिताच्या विरोधात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांविषयी सोशल मीडिया माध्यमातून जनजागृती करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखालील टीम करणार आहे.

संदीप पवार हे यापूर्वीही विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले असून, त्यांचा जनसंपर्क व संघटन कौशल्याचा अनुभव या नव्या जबाबदारीत उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीबद्दल काँग्रेसचे राज्य सचिव अॅड. रविकरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार, तसेच मनोज ठेंगील, रवींद्र शिवशरण आणि ज्ञानेश्वर हर्डीकर यांनी संदीप पवार यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडिया हे प्रभावी जनसंपर्काचे साधन असल्याचे नमूद करत, पक्षाच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रभावी उत्तर देण्यासाठी या माध्यमाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!