Homeताज्या बातम्याखडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत दिला आधार

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन लहान मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आर्थिक मदत करत शैक्षणिक खर्चासाठी देखील मदत
या पार्श्वभूमीवर भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी खडकी येथे भेट देत घोडके कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदतही प्रदान केली. तसेच, घोडके कुटुंबातील स्वप्निल घोडके याचा पुढील शैक्षणिक खर्चासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या या संवेदनशील आणि दानशूर भूमिकेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. मंगळवेढा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना आजपर्यंत घडल्या आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी पोहोचत अनिल सावंत यांनी मदत केली आहे. अनिल सावंत यांच्या या कृतीचे मंगळवेढा तालुक्यातून कौतुक होत आहे.

या भेटीदरम्यान सखाराम बेलदार, ह.भ.प. सुदर्शन महाराज, हौसाप्पा शेवडे, संभाजी मस्के, युवराज बंडगर, बाबुराव ठोंबरे, परमेश्वर लेंडवे, पंकज चव्हाण, गणेश रणदिवे यांच्यासह खडकीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मिळून घोडके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!