Homeताज्या बातम्यामाझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी...

माझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी सत्कार, गावातून मिरवणूक काढत जेसीबीने केली फुलांची उधळण

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कृषी उपसंचालक पदावर झेप घेतली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सोनाली दोलतडे यांनी आपल्या यशामागील प्रेरणा सांगताना भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त केले. “मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि यातना मी जवळून अनुभवल्या आहेत. त्या मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर पाहिल्या आहेत. त्यामुळे मला मिळालेल्या पदाचा उपयोग मी नक्कीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सोनाली दोलतडे यांच्या या यशाबद्दल नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभात बोलताना अनेकांनी सोनालीच्या जिद्दीचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे कौतुक केले. लहानशा गावातून मोठे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सोनाली दोलतडे या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे येण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

या यशाच्या जोरावर सोनाली दोलतडे यांची राजपत्रित कृषी उपसंचालकपदी निवड झाली असून, पुढील काळात त्या कृषी क्षेत्रात काम करताना शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यास आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी दोलतडे, भिवा लवटे, कोकरे, इंजिनीयर देवा दोलतडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, सभापती दिपाली ताड, रासपाचे प्रदेश सरचिटणीस सोमाआबा मोटे,पं.स‌. सदस्य डॉ. आप्पासाहेब निकम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कोकरे, दामाजीचे संचालक भिवा दोलतडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, माजी सरपंच बाळासाहेब गरंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, वसंत बंडगर, दामाजीचे माजी संचालक लक्ष्मण नरुटे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे, युवक नेते वसंत गरंडे, ऊसतोड वाहतूक ठेकेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष दामाजी बंडगर, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, श्री माऊली पतसंस्थेचे संस्थापक आण्णासाहेब बंडगर, भागवत बंडगर, दादा मोटे हे उपस्थित होते.

पाठीराखा “देवाभाऊ”
सोनाली दोलतडे हिचे मोठे भाऊ देवा दोलतडे सोनालीसह तिच्या इतर दोन बहिणी व संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले आहेत. स्वतः इंजिनीयर असलेल्या देवा यांची एक बहीण कृषी उपसंचालक एक बहीण वकील आणि तिसरी बहीणही उच्चशिक्षित आहे. प्रसंगी स्वतःच्या शिक्षणाला कमी महत्त्व देऊन बहिणींच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन देवा दोलतडे यांनी आपल्या तिन्ही बहिणींना उच्चशिक्षित बनविले. देवा दोलतडे यांच्या या कार्याचे सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतात कौतुक केले. यावेळी बोलताना देवा दोलतडे म्हणाले की, मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा. मुली शिकल्या तरच आपल्या समाजाचे प्रगती चांगल्या प्रकारे होईल.

सोनाली दोलतडे यांच्या माहेर आणि सासर दोन्ही कडील नातेवाईकांचा झाला सन्मान
सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सोनालीचे आई-वडील भाऊ-वहिणी, बहिणी तसेच पती, सासू, ननंद यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सोनालीची वहिनी, पति,सासू, ननंद यांचे विशेष कौतुक केले.

जेसीबी मधून फुलांची उधळण करीत निघाली मिरवणूक
सोनाली दोलतडे हिची नंदेश्वर गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चक्क जेसीबी मधून फुलांचे उधळण सोनाली हिचेवर करण्यात आली. यावेळी मिरवणुकीत अनेकांनी ठेका धरला. यामध्ये अनेक उच्चशिक्षित विविध क्षेत्रात नोकरीला असणारे नोकरवर्ग यांचाही समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!